शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....


शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ...

पनवेल / प्रतिनिधी  : -   शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवसेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री  आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन,तसेच शिवसेना मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व  शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, खारघर शहरातील उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट (CA) तसेच शेकडो महिला व पुरुषांचा उपमहानगर प्रमूख दिपक घरत, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर व शाखा प्रमुख अनिल तळवणेकर यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. 

खासदार  बारणे यांनी बोलताना संगितले की  शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रातील सर्व व्यापारी व कामगारांना समान न्याय करतात व हा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांवर
चालणारा पक्ष आहे, त्यामुळे या पक्षात आपण सर्वांना सन्मान मिळेल तसेच येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा इतर पक्षापेक्षा चांगले काम करेल हे निश्चित आहे. 

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुका संघटक भरत पाटील , विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख पनवेल ग्रामीण विभाग ज्ञानेश्वर बडे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड, सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख आकाश शेलार, शाखा प्रमुख सचिन ठाकुर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, उपमहानगर संघटिका मंदा जंगले,  पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, युवसेना पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image