गाडीच्या डिकीतून मोबाईल केला लंपास....
गाडीच्या डिकीतून मोबाईल केला लंपास....

पनवेल,  दि.०७  (संजय कदम) ऍक्टिवा स्कुटीमधील डिकीमध्ये ठेवलेला एक मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील मोरबे येथील धरणाच्या काठी घडली आहे.
रोहन हातमोडे हा तरुण त्याच्याकडील ऍक्टिवा स्कुटीमध्ये १५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल डिकीमध्ये ठेवून धरणाच्या काठी फिरण्यास गेला असता अज्ञात चोरट्याने डिकीचे लॉक तोडून लबाडीने मोबाईल चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Comments