भाजपा युवानेते हैप्पी सिंग यांचे कार्य कौतुकास्पद- आमदार प्रशांत ठाकूर....
भाजपा युवानेते हैप्पी सिंग यांचे कार्य कौतुकास्पद- आमदार प्रशांत ठाकूर...
पनवेल (प्रतिनिधी) भाजपा युवानेते हैप्पी सिंग यांच्या माध्यमातून रविवारी कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कामोठे वासियांना उटणे व पणतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक आ. प्रशांत ठाकूर यांनी करून घराघरात पोहोचण्याचे काम विविध सामाजिक बांधिलकीद्वारे येथील कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
         यावेळी आयोजक युवानेते हैप्पी सिंग,कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, तसेच संस्थापक अध्यक्ष हरजिदंर कौर हॅपी सिंग,नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत,नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर,युवा मोर्चाचे हर्षवर्धन पाटील,रमेश म्हात्रे, प्रकाश पाटील, प्रदिप भगत, भाऊ भगत, रवी गोवारी आर पी आय कामोठे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, रवी कांबळे, नाना मगदूम , आकाश कवडे,भटके विमुक्त आघाडीच्या महिलाध्यक्ष विद्या तामखेडे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील,सचिव फातिमा आलम,चिटणीस दीपाली तिवारी,उपाध्यक्ष साधना आचार्य रश्मी भारद्वाज,सदस्य लता गाडगे,सोनाली खरटमोल,विद्या कावले,वर्ष शेलार,मनीषा बनवे, सुरेखा लांडे,वैशाली जगदाळे,ललिता इन्कर,उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले कि कोरोना काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विविध योजना भारतवासीयांसाठी राबविल्या होत्या. त्या सर्व योजना कामोठे वासियांसाठी वर्षभरापासून राबवत आहोत आजही ना नफा ना तोटा या तत्वावर दिवाळी फराळाचे साहित्य विक्री चालू आहे. तसेच हैप्पी सिंग यांनी सुद्धा कामोठे वासियनसाठी उटणे व पणतीचे वाटप केले आहे ते कौतुकास्पद असल्याचे यावेळी ते म्हणाले. तर आयोजक हैप्पी सिंग यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवित असतो. त्यामुळे कामोठे वासियांच्या मनात आमच्या बद्दल आपुलकी व आत्मियता आहे. तर नगरसेवक विकास घरत यांनी सांगितले की, भाजपा हा पक्ष नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा पक्ष आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे. तर नागरी प्रश्नावरसुद्धा सिडको विरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळेच कामोठे वासिय भाजपच्या पाठीशी ठाम उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.
             

फोटोः आ. प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून उटणे व पणतीचे वाटप करताना उपस्थित पदाधिकारी व महिला आघाडी
Comments