करंजाडेत स्वच्छतेची मोहीम अंतर्गत रस्त्यांची साफसफाई ; सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः गांधी जयंती निमित्त करंजाडे येथील सरपंच आणि सामाजिक संस्थायांच्या सहकार्याने शनिवारी ता. 2 ऑक्टोबर रोजी करंजाडे गाव व वसाहत परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. महात्मा गांधी जयंती निमित्त ही गांधीगिरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील साफसफाई करून रस्ते कचरामुक्त करण्यात आला.
अहिंसा, सत्याबरोबर स्वच्छतेची शिकवण देणार्‍या महात्मा गांधी यांचा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष कटाक्ष्य होता. देशभरात 2 आँक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान ठिकठिकाणी घेण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी याकरीता पुढाकार घेतला. आर.आर.पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले त्याचा राज्यात सकारात्मक परिणाम झाला. आजमितीला अनेक खेडे निर्मल ग्राम झाले असून सार्वजनिक आरोग्य सुधारले आहे. ग्रामीण भागात मात्र ही चळवळ फारशी रूजली नसल्याचे दिसून येत आहे. परिणाम रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पान आणि तंबाखू खाऊन थुंकणार्‍यांची संख्याही कमी नाही. आपण आपल घर नेहमी स्वच्छ ठेवते त्या ठिकाणी कचरा टाकत नाही किंवा थुंकत नाही त्याप्रमाणे आजूबाजूचा परिसर आपलाच आहे ही मानिसकता होणे गरजेचे झाले आहे. त्या ठिकाणी कचरा टाकणे किंवा थुकणे चुकीचे असून आपला परिसर आपण स्वच्छ ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अशी प्रतिज्ञानाही आयोजकांनी गांधी जयंती निमित्ताने उपस्थितांना दिली. या मोहीमेत जेष्ठ नागरिक संस्था, करंजाडे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ, करंजाडे फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन, सिरवी समाज सेवा संस्था, श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंडळ, गावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दक्षराज सामाजिक विकास मंडळ, प्रबुद्ध सामाजिक संस्था, साकार अकॅडमी, नवतरुण मित्र मंडळ करंजाडे बौद्धवाडा, जेष्ठ नागरिक, गणेश मित्र मंडळ गणेशनगर करंजाडे, महिला बचत गट, आंगणवाडी शिक्षिका व मदतनीस, डॉक्टर, मेडिकल असोसिएशन, व्यापारी वर्ग, रिक्षा चालक मालक संघटना, सफाई कर्मचारी, महिला मंडळ युवक मंडळ सामाजिक संस्था, नागरिक व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कापडी पिशव्या हाती घेत प्लास्टिकमुक्तीचे व्रत
करंजाडे वसाहतीमध्ये ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, महिला मंडळ यांनी प्लास्टिकमुक्तीची चळवळ अधिक गतिमान व व्यापक सुरु केली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी जयंतीचे औचीत्त्य साधत सिरवी समाज सेवा संस्थाच्या वतीने कापडी पिशव्या मोफत वाटण्यात आल्या. यावेळी प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, शिरवी समाज संस्था व सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी आवाहन केले.
स्वच्छतेला पनवेल वेस्ट आर्गोनायशेनचे सहकार्य
माझी प्लास्टिक माझी जबाबदारी
पनवेल वेस्ट आर्गोनायशेन वतीने करंजाडे येथील स्वच्छ मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.
प्लास्टिक रिसायकलची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आपला घरचा प्लास्टिक जमा करून तो प्लास्टिक रिसायकल सेंटरवर घेऊन जाणे यासाठी करंजाडे येथील सई पवार यांच्यासह महिलांनी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यावेळी या मोहिमेमध्ये पनवेल वेस्ट आर्गोनायशेने देखील सहभाग घेऊन प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी प्राजक्ता सहा यांनी या महिमेची माहिती दिली. या माझी प्लास्टिक माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये सई पवार, अंजली मानपुरे, प्रतीक्षा लांगी, कविता कदम, रेशमा मोरे, ऋतुजा महामुनी, आशा खेडेकर, मिथू लांडगे यांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला आहे.
स्वच्छ सुंदर करंजाडे
स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे हि संकल्पना राबवून भविष्यात रोगराई पसरली जाते ती कशी कमी होईल याकडे लक्ष ठेवणार आहोत. सिडको प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिडकोला या वसाहतीमध्ये स्वच्छतेची गरज असल्याचे लक्षात आणून दिले आहे. या मोहिमेला सामाजिक संस्थानी सहकार्य केले आहे.
- रामेश्‍वर आंग्रे - सरपंच
करंजाडे ग्रामपंचायत


फोटो ः करंजाडे येथील स्वच्छता मोहिम
Comments