शिवसेना नेते बबनदादा पाटील यांच्या मागणीला यश ; तळोजा फेज १ व २ येथील रस्त्याचा व जलकुंभाचा प्रश्न मार्गी लागणार....
शिवसेना नेते बबनदादा पाटील यांच्या मागणीला यश ; तळोजा फेज १ व २ येथील रस्त्याचा व जलकुंभाचा प्रश्न मार्गी लागणार....
पनवेल / प्रतिनिधी  : -  तळोजा येथील रस्त्याची दुरावस्था पाहून आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेना नेते बबनदादा पाटील यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून शहरातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 
या पाठपुराव्याला यश आले असून तळोजा फेज 2 ला 16 कोटी आणि तळोजा फेज 1 ला 12 कोटी ची निवीदा मंजूर झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि तळोजा फेज 1 आणि फेज 2 या परिसरामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते लवकरच तयार होतील

याशिवाय गेल्या  अनेक वर्षापासून असलेल्या तळोजा फेज 1 आणि फेज 2 येथिल   कमी दाबाची पाण्याची समस्या देखील सुटनार  आहे तळोजा फेज एक आणि फेज 2 येथे  पाण्याच्या जलकुंभांचे  स्वीकृतीपत्र कंत्राटदारास दिले असून  लवकरच काम सुरू होणार आहे
Comments