वाजे येथील सहाय्यक शिक्षक गजानन बारकु पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...


नवीन पनवेल : शिक्षक हा एक समाज घडवणारा दुवा आहे, त्यांच्या कार्याचे मोल करता येत नाही. परंतु ते करत असलेल्या कार्यात त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२०-२१ वितरित करण्यात आला. पनवेल तालुक्यातील वाजे हायस्कूल वाजे येथील सहाय्यक शिक्षक गजानन बारकु पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे.

           यावेळी रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे, कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटीलरायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिकडॉ.ज्ञानदा फणसे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदी. मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या समवेत आदर्श शिक्षक पुरस्कार हा पनवेल तालुक्यातील वाजे हायस्कूल वाजे येथील सहाय्यक शिक्षक गजानन पाटील यांना देण्यात आला. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

Comments