सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात गरजूंना मिळणार मोफत प्रवेश सुरु.....
सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात गरजुंना मिळणार मोफत प्रवेश सुरु.....

पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः डॉ नेल्सन मंडेला निवासी शासन मान्य शाळेला 30 वर्ष पुर्ण झाली असल्याने या निमित्ताने संस्थेच्या संचालक डॉ जी के डोंगरगावकर यांनी गैर विजाभज संवर्गातील सर्व जाती जमाती दरम्यान समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात मोफत पहिली ते दहावी सेमी इंग्रजी शिकणार्‍या विद्यार्थ्याना प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे.
गेल्या तीन दशक पासून विजाभजसाठी रायगड जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे. या शाळेत केवळ 120 विद्यार्थ्यांना जेवणाची सोय शासनाकडून केली जाते त्यामुळे अन्य जातीजमाती व धर्माचे आर्थिक दृष्ट्या दुबळे आणि दर्‍याखोर्‍यातील ग्रामीण आणि मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीत राहणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज आणि शैक्षणिक वातावरण अभावी गळतीचे प्रमाण मोठे आहे म्हणून संस्थेच्या संचालकाने सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना नागोठणे येथील समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात मोफत प्रवेश देत असल्याचे डोंगरगावकर म्हणाले. 
या विद्यार्थ्यांसाठी शासनाची कोणतीही मदत तथा अनुदान अथवा देणगी घेतली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या घडीला शासन कर्ज बाजरी झाल्यामुळे  सर्व शालेय विद्यार्थ्यांना भोजन, शिक्षण, निवास आणि सुविधा देण्यासाठी अनुदान मिळणे हे जीकिरीचे झाले आहे.याचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संगरातील सहकारी बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्या नावाने हे वस्तीगृह सुरु केले असल्याचे डोंगरगावकरांनी सांगितले. नागोठणे परिसरात इंग्रजी ऑरटीइ अंर्तगत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही संवर्गाच्या विद्यार्थ्यांची त्याच शिक्षण पूर्ण होई पर्यंत या वस्तीगृहातील सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. 
यासाठी कोकण आणि एमएमआरडी क्षेत्रातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा यासाठी नवी मुंबईतील सेक्टर 19 मधील सुप्परक भवन  या क्रमांकावर (99309 58025) संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image