हॉटेल मॅनेजर मोटारसायकलीसह मोबाईल फोन व रोखरक्कम घेऊन झाला पसार....
हॉटेल मॅनेजर मोटारसायकलीसह मोबाईल फोन व रोखरक्कम घेऊन झाला पसार....

पनवेल, दि. २४ (संजय कदम)-  हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा इसम तेथील मालकिणीच्या मोटारसायकलीसह मोबाईल फोन व रोखरक्कम घेऊन पसार झाल्याची घटना तळोजा फेज -01 येथे घडली आहे.
            याठिकाणी असलेल्या यादवन प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या असिफ युसूफ शेख (वय-32) याने कोणास काही एक न सांगता हॉटेल कामासाठी वापरण्यात येत असलेली 15 हजारांची सुझुकी मोटारसायकल, 3 हजारांचा रेडमी मोबाईल व 10 हजार रोखरक्कम असा 28 हजारांचा ऐवज घेऊन तो पसार झाल्याने याबाबतची तक्रार प्रिया शेडगे यांनी तळोजा पोलिस ठाण्यात केली आहे.
Comments