पर्यटकांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या दुकली गजाआड ; १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त.. १६ मोबाईलवर केला होता हाथ साफ...
पनवेल वार्ताहर : — पनवेल तालुका परिसरातील पर्यटन केंद्रावर मैज मज्जेसाठी आलेल्या पर्यटकांच्या मोबाईल वर डल्ला मारणाऱ्या दुकलीचा पनवेल तालुका पोलिसांनी र्दाफाश केला आहे. या दोन आरोपी कडून पोलिसांनी 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे 16 मोबाईल जप्त केले आहे. हे दोन्ही आरोपी पनवेल तालुज्यातील वावाजे गावातील रहिवाशी आहेत. रमेश रघुनाथ पाटील, (वय 32 वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळेचे जवळ, वावंजे, पनवेल, जितेश भगवान जोगले, (वय 24 वर्षे) रा. कुंभारपाडा, वावंजे, पनवेल,असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी वावंजे गावातील रहिवाशी आहे.
पनवेल शहरातील सौ. वर्षा अभय पाटील वय 41 वर्षे, राहणार श्री अथर्व सोसायटी, मिडलक्लास सोसायटी, पनवेल, हे गुरुवारी ता.30 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या कुटुंबासह पनवेल तालुका परिसरातील पर्यटनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या सर्वांचे मोबाईल एका सॅकबॅगमध्ये ठेवून ती सॅकबॅग ईको कारमध्ये ठेवून गाडी पार्क करून ते कुटंबासह मोहदर नदीकाठी फिरण्यासाठी गले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी ईको कारचे डिक्कीचे लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले फिर्यादी यांचे मोबाइल सॅकबॅग मधून चोरी झाले होते. यावेळी आपले मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्या नुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दैडकर साहेब यांनी मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने माहीती घेवून सखोल तपास करून आरोपीना मंगळवारी वावजे गावातून अटक केली आहे. या आरोपीचा अधिक तपास केला असता 4 मोबाईल व इतर चोरी केलेले 12 मोबाईल असे एकुण 16 मोबाइल एकूण किंमत रु. 1,92,000 /- चा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे.