शिवसेना पनवेल उपतालुका संघटकपदी आबासो लकडे यांची नियुक्ती....
पनवेल वैभव वृत्तसेवा : - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, शिवसेना नेते,उद्योगमंत्री (महाराष्ट्र राज्य) संपर्क नेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली आबासो लकडे यांची "पनवेल उपतालुका संघटक" पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत व शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या प्रसंगी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर ,तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे , तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक दादा घरत, कळंबोली शहरप्रमुख डि.एन. मिश्रा,शहर समन्वयक गिरीश धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपशहर प्रमुख नारायण फडतरे, सुर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख आकाश शेलार,दत्ता सोल्वन्कर, शशिकांतशेठ, अर्जुन जाधव, हनुमान रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.