विभाग प्रमुखांच्या बैठकित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना...


विभाग प्रमुखांच्या बैठकित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना...
पनवेल, /  दि.21 : -  महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विविध कामाचा आढावा घेऊन ही कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त  गणेश देशमुख यांनी आज झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आठवडी बाजार व दैनिक बाजरांचे नियोजन करण्यासाठी त्याचे आराखडे तयार करण्याच्या सूचना  संबधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या. 

तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचा प्रस्ताव तयार करणे, चार वॉर्ड ऑफीसचा आराखडा तयार करणे, महापौर बंगला टेंडर काढणे, वडाळे तलाव सुशोभिकरण करणे, पाणीपुरवठा वितरणाचा आराखडा करणे, नित्यानंद मार्गाचे रुंदीकरण करणे, घनकचरा विभागासाठी अतिरिक्त वाहने खरेदी करणे, मुख्यालय आणि नाट्यगृह याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प राबविणे अशा विविध विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. 
 
तसेच ही कामे लवकरात लवकर होण्याकरिता विभागप्रमुखांनी आणि संबधित अधिकाऱ्यांनी गतीने काम करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ , उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, डॉ.वैभव विधाते, सुवर्णा दखणे यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख ,अधिकारी उपस्थित होते.
Comments