२११.२ तोळे बनावट सोन्याचे दागिने खारघर पोलिसाने केले हस्तगत ; खारघर पोलिसांची कारवाई... चार आरोपींना केली अटक
२११.२ तोळे बनावट सोन्याचे दागिने खारघर पोलिसाने केले हस्तगत ; खारघर पोलिसांची कारवाई... चार आरोपींना केली अटक ...
पनवेल वार्ताहर :-  बनावट सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून, त्या सोन्यावर लाखो रुपयांचे कर्ज उकळणाऱ्या टोळी कडून खारघर पोलिसांनी 211.2 तोळे बनावट सोने जप्त केले आहे. खोट्या सोन्याला सोन्याच्या पाण्याची झळाळी देऊन ते सोने खरे असल्याचे भासवून त्यावर ही टोळी हे सोने बँकेत ठेवून कर्ज काढायची त्या पैश्यावर अय्याशी करायची या प्रकरणी खारघर पोलिसांनी या 8 जणांच्या टोळी पैकी 4 आरोपीने अटक केली आहे.
    सवोवी वेन्सन मार्टिन वय 45 राहणारा नेरुळ , परशुराम सखाराम देवरूखकर वय 45 राहणार खारघर, भरत शुभसिंग राजावत वय 30 राहणार नेरुळ, सुनील फराटे वय 47 राहणार खारघर असे पकडलेल्या चार आरोपीचे नावे आहे. हे चार आरोपी अन्य फरार असलेल्या चार आरोपीच्या मदतीने, बनावट सोने खरे भासवून, बँकेत ठेवायचे आणि त्याच्यावर कर्जाच्या स्वरूपात पैसे उकळत होते. मात्र कामोठे येथील तक्रारदार प्रमोद गर्ग यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या नंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. आरोपी पैकी  सवोवी मार्टिन हा तक्रारदार गर्ग याचा मित्र होता. मार्टिन याने खारघर येथील ग्रेट बॉम्बे बँक शाखा खारघर येथे तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने सोडवून आणल्या नंतर त्या सोन्याची चैकशी केली असता हे सोने बनावट सल्याचे गर्ग यांच्या लक्षात आले. त्या नुसार गर्ग यांनी या घटनेची महिती पोलीसांना दिली आणि पोलिसांनी या बाबत गुन्हा नोंदऊन याची तपासणी करण्यास सुरुवात केली. नेरुळ आणि कोपरखैरणे येथील सोन्याचे व्हॅल्यूएशन करुन देयची आणि त्यांच्यातील काही फरार आरोपी मधील आरोपी हा बनावट दागिने बनवून देयचा आणि याच टोळीतील एक मित्र त्याच्या मित्राच्या नावावे बँकेत सोने ठेवून त्यावर कर्ज देखील घेयचा या गुन्ह्यांची उकल झाल्या नंतर खारघर पोलिसांनी या टोळीतील जवलर्स व्यापारी याना देखील अटक करून त्याच्या कडून 211.2 तोळे सोने आरोपी कडून जप्त केले आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image