माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता, घोडके हॉस्पिटल समोरील ड्रेनेज झाकणाचे काम घेतले करून..
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता, घोडके हॉस्पिटल समोरील ड्रेनेज झाकणाचे काम घेतले करून..
पनवेल : - प्रभाग १८ मधील घोडके हॉस्पिटल आणि नाडकर्णी हॉस्पिटल समोरील रस्त्याच्या मधोमध असलेले ड्रेनेजचे कव्हर खाली दबले गेल्यामुळें तिथे एक मोठा खड्डा तयार झाला होता.घातक ठरत असलेल्या खड्यांमुळे तीन ते चार अपघात होऊन दुचाकी वाहन चालक जखमी ही झाले होते.याबाबतची तक्रार नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली. नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित लक्ष घालत महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोलून ड्रेनेज कव्हर चे झाकण काढून ते रस्त्याच्या लेव्हल ला येईल असं बांधकाम करून घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर ला सांगितले.नागरिकांच्या तक्रारींकडे त्वरित लक्ष देऊन नगरसेवक विक्रांत पाटील काम पूर्ण करून घेतात त्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments