मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी गांधी जयंती निमित्त स्वच्छता दूतांचा केला सत्कार

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियानाचे अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमा मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा सन्मान केला.पनवेल महानगरपालिका स्वच्छता दूत असे प्रशस्तीपत्र देऊन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या कर्मचार्‍यांचा सन्मान आज महात्मा गांधी उद्यानात केला.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुलें वाहुन त्यांनी अभिवादन केले.पनवेल महानगरपालिकाच्या वतीने कर्मचार्‍यांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळाल्या बद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.या प्रसंगी सॅनिटरी इन्स्पेक्टर श्री जयेश कांबळे, उदय पाटील, रोहन वाजेकर, सचिन कुलकर्णी व सर्वं सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
फोटो ः स्वच्छता दुतांचा सत्कार
Comments