तळोजातील केमस्पेक कारखान्यात भीषण आग....
तळोजातील केमस्पेक कारखान्यात भीषण आग....
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसी मधील  केमस्पेक या केमिकल कारखान्याला आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली .
या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही .
 घटनास्थळी अग्निशामक दल पोलीस प्रशासन यांनी उपस्थित राहून या कंपनीची आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.  आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसलेतरी वारंवार या कारखान्यात अशा आगीच्या घटना घडत आहेत.  तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कारखान्यांमधील केमिकल कारखान्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे.
सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार रसायन मिश्रीत प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारच्या आगीच्या घटना घडत असतात , मात्र वारंवार अशा भीषण आगीच्या घटना घडण्याचे नेमके कारण काय ? हा प्रश्न उपस्थित होत असून यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत परिसरात असलेल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या जीवा चा मोठा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image