पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून मा.नगरसेवक संदिप पाटील यांनी वाटल्या व्यापारी व दुकानदारांना कापडी पिशव्या..

पनवेल वैभव वृत्तसेवा : - आज दि २६. रोजी पर्यावरणपूरक निर्णय घेऊन प्लास्टिक पिशव्याना विरोध करून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील (मा.नगराध्यक्ष प.न.प.) यांनी प्रभाग क्र १७ मध्ये मंगलमूर्ती फेरीवाला मार्केट येथे व्यापारी, दुकानदार यांना कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
 
याप्रसंगी जयंत पगडे(अध्यक्ष पनवेल शहर भा. ज.पा.),तेजस कंडपीळे नगरसेवक( पनवेल महानगरपालिका) , चारुशीला घरत नगरसेविका( पनवेल महानगरपालिका),सुशीला घरत नगरसेविका( पनवेल महानगरपालिका) व व्यापारी वर्ग भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments