पनवेल, दि.१२ : - पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कळंबोली येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि डी. जी. तटकरे न्यू इंग्लीश मिडीयम शाळा तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळा आणि माजी आमदार दत्तूशेठ पाटील हायस्कूल या चार ठिकाणी नवी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यावेळी २७ ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसींचे डोस देण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लसीकरणास गती दिली जात असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याकरिता आयुक्त गणेश देशमुख प्रयत्नशील आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक लसीकरण केंद्राचे नियोजन करत आहेत.
आज सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूलमध्ये ५०९, डी.जी. न्यू इंग्लीश मिडीयम शाळेमध्ये ४४४ तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळेत २००, माजी आमदार दत्तूशेठ पाटील हायस्कूलमध्ये ३८० डोस देण्यात आले. आज महानगरपालिका क्षेत्रातील ३६ केंद्रावर एकुण १० हजार ५७१ डोस देण्यात आले.