प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
पनवेल दि. ०३ (वार्ताहर) :-  पनवेल-उरण गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी या घरांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. हे सर्वेक्षण पुढील दोन महिन्यात पूर्ण करून त्यानंतरच या घरांना नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घर नियमित करण्यासाठी त्याचे सूत्र ठरवण्यासाठी २९ गावांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी दिले होते. त्याच धर्तीवर पनवेल-उरण पट्ट्यातील ५५ गावातील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी या प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निश्चित आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नसल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पुढील दोन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.
पनवेल-उरण मधील प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई विमानतळासाठी आपली जमीन दिली असल्याने त्यानी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, मात्र त्यासाठी या घरांचे सर्वेक्षण करणे गरजेचे असून त्यानुसार तसे आदेश दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांना हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्रकल्पग्रस्तांनी देखील त्यांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना या बैठकीत केले. तर शासन जर आमची घरे नियमित करण्यासाठी सकारात्मक असेल तर प्रकल्पग्रस्तही या सर्वेक्षणासाठी शासनाला पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.

यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील,  बबनदादा पाटील अध्यक्ष पनवेल उरण महाविकास आघाडी, मनोहर भोईर माजी आमदार, आर सी घरत जिल्हाध्यक्ष काँग्रेस पनवेल, महेंद्रशेट घरत जिल्हाध्यक्ष रायगड काँग्रेस, शिरीष घरत जिल्हाप्रमुख शिवसेना,  प्रशांत पाटील सचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, सतीश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जे एम म्हात्रे माजी नगराध्यक्ष, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल, सुदाम पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल नाईक जिल्हाध्यक्ष समाजवादी पक्ष, गणेश कडू जिल्हा चिटणीस शेकाप,लीना गरड नगरसेविका, कॅप्टन कलावत उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस यांच्या समवेत मा श्री फाटक साहेब सचिव नगरविकास, भूषण गगराणी सचिव नगरविकास,  सिडको व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी सहव्यवस्थापकीय  संचालक शिंदे साहेब, गणेश देशमुख आयुक्त पनवेल महानगरपालिका तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक पार पडली प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली बांधकामे कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सर्व बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने सर्व्हे लवकरात लवकर करून प्रकल्पग्रस्तांनी केलेली जी बांधकामे आहेत ती हद्द निश्चित करून सरकार लवकरच ती सर्व बांधकामे अधिकृत करून तेथील भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलणार आहे.सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना सहकार्य करून लवकरात लवकर सर्व्हे करून घेण्यात यावे आणि आपला प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा आणि सर्व्हे झाल्यानंतर सुद्धा  सिडको कोणतीही तोडक कारवाई करणार नाही असे अभिवचन एकनाथ शिंदे उपस्थित शिष्टमंडळास दिले त्याचप्रमाणे मालमत्ता कर बाबतीत चालू वर्ष पासून कर लावावा व करात आणखी सूट द्यावी ही विनंती महाविकास आघाडीने केल्यानंतर त्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी संगीतले.प्रास्ताविक करत असताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की दिवंगत दि बा पाटील साहेब यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाविकास  आघाडी करणार आहे तरी गरजेपोटी बांधलेली बांधकामे सर्व नियमित करावी जेणेकरून दिवंगत दि बा पाटील साहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
      
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image