मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला टेनिस कुमार गटातील राष्ट्रीय विजेता कु.आकांशा नितुरे चा सन्मान

पनवेल :- पनवेल मधील रहिवासी  कु.आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तीच्या घरी जाऊन सत्कार केला.

आपली जिद्द आणि मेहनतीने च्या जोरावर विजेतेपद पटकवल्याबद्दल आकांशाचे त्यांनी कौतुक केले.कोरोना काळात सराव करायला खूप कमी वेळ आणि स्वतः व तिचे कुटुंब संक्रमित होऊन सुद्धा तिने जिद्द सोडली नाही याबाबद्दल विक्रांत पाटील यांनी तिचे विशेष कौतूक केले.
यावेळी विक्रांत पाटील यांनी कु.आकांशा बरोबर बातचीत करतांना तिच्या दिनचर्या,सराव आणि मिळालेल्या विजेतेपदांची माहिती घेतली.कु आकांशा येणाऱ्या काळात देशाचे नाव टेनिस मध्ये नक्कीच उजवल करेन असे मत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आणि कु.आकांशाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
Comments