उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना होणारे स्वराज संजय सोनवणे व विरेन ठाणगे यांना विविध संस्थांतर्फे शुभेच्छा...पनवेल / प्रतिनिधी : -   कु. स्वराज संजय सोनावणे  हे " बार ॲट लाॅ डिग्री " या अभ्यासक्रमासाठी आणि कु. विरेन विजय ठाणगे हे " फायनान्स मास्टर डिग्री " अभ्यासक्रमासाठी लंडन येथे जात असल्यामुळे त्या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी एस.आर.एस ग्रुप यांचे पनवेल येथील कार्यालयात सुरेख समारंभ आयोजित केला होता. 
याप्रसंगी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे  सन्माननीय पदाधिकारी, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे पदाधिकारी, रूद्रवली बौध्दजन विकास संस्थेचे पदाधिकारी, एस आर एस ग्रुप चे संचालक व स्टाफ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Comments