पनवेल वैभव वृत्तसेवा : - २५ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. वैदकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण घटक असून सुद्धा डॉक्टरांच्या तुलनेत कमी कौतूक मिळालेला घटक म्हणजे "फार्मासिस्ट"
सरकारी वैदकीय सेवे मधील अथवा खाजगी मेडिकल स्टोर मधील 'फार्मासिस्ट' हा नेहमी कौतुकापसून दूर राहिला.त्याच्या सेवेला म्हणवं तेवढं महत्व समाजाकडून मिळाले नाही.आणि म्हणूच वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण घटकाचा सन्मान करण्याचा निर्धार नगरसेवक,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी घेतला. २५ सप्टेंबर या जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त प्रभागातील खाजगी मेडिकल स्टोर तसेच उपजिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या सर्व फार्मासिस्ट यांचा सन्मान करण्यात आला.
फार्मासिस्ट कार्यरत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतात आणि आज जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त त्यांच्या वतीने फार्मासिस्ट यांचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल सर्व फार्मासिस्टने नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले.कोरोना काळात डॉक्टरच्या बरोबर खांद्याला खांदा लावून फार्मसिस्टने सुद्धा जनतेची सेवा केली आहे.अश्या आपल्या फार्मसिस्ट मित्र-मैत्रिणींचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी निलेश वाडेकर, रोहन वाजेकर, सचिन कुलकर्णी, दुर्वांक कामेरकर, संकेत शेटे, सनी सोनवणे, वसुधा सोलंकी, स्वाती पवार, गीता शाह आणि हर्षा ठक्कर आदी उपस्थित होते.