पनवेल महानगरपालिका व सिडको नोडमध्ये कृत्रीम पाणी टंचाई करून जनतेला वेठीस धरले जात आहे - भरत पाटील

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका व सिडको नोडमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून जनतेला वेठीस धरले जात आहे तरी याबाबत पोलिसांन मार्फत गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे. 
या निवेदनात भरत पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील सिडको भूसंपादीत परिसरातील गावे , सिडको नोड मधील व पनवेल महानगरपालिका हददीत कृत्रिम पाणी टंचाई बाबत यापूर्वी मा.व्यवस्थापकीय संचालक , सिडको यांना पत्र दिलेले होते.सदर पत्राच्या अनुषंगाने आज पर्यंत त्यांच्याकडून उत्तर प्राप्त झालेले अथवा पाणी टंचाईचे अरिष्ठ दूर झालेले नाही अशा परिस्थितीत सामान्य जनतेच्या मनात काही प्रश्‍न व मानव निर्मिती कृत्रिम पाणी टंचाई बाबत संशय निर्माण होतात. पनवेल महानगरपालिका व सिडको नोडमध्ये पाण्यांचे नियोजन करताना विषयांकित भागात कसे पाणी कमी देता येईल याकडे हंगामी कर्मचारी व सिडको प्रशासन लक्ष देत असेल , तर त्यावावत पोलिसांनी आपले अधिकार वापरून तड लावणे आवश्यक व गरजेचे असून टॅन्कर लॉबी बंद करणे गरजेचे आहे.पाणी टंचाईमुळे टॅन्कर लॉवीचे फावते व त्यासाठीच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे.सध्या सामान्य जनतेला निसर्गाकडे मिळणार्‍या पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते , वेळ प्रसंगी मारहाणीचे प्रसंग निर्माण होतात. याबददल सखोल चौकशी करण्यांची नितांत गरज आहे . सिडको व महानगरपालिका पाणीपुरवठा प्रशासनाकडून सध्या कमी पाणीपुरवठा करणे , पाणी पुरवठा कर्मचारी व मुख्य जलवाहिनी , पाणीपुरवठा हाताळणारे कर्मचारी यांच्यामध्ये संगनमत असून , मुख्य जलवाहीनी कर्मचारी व नोड मधील कर्मचारी कमी दाबाने पाणीपुरवठा करीत असतात . वास्तविक पहाता सध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला आहे . अशा प्रसंगी कमीतकमी पुढच्या जुलै 202 पर्यत पाण्यांची कपात करण्याचे संकेत शासनाचे नाहीत , अशा परिस्थितीत सिडको नोडमधील व भूसंपादीत गावांतील सर्वसामान्य रहिवाशांना पाण्यांसाठी वेठीस धरणे योग्य वाटत नाही.यावावत युध्दपातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे . पोलिस प्रशासनाने सिडको व पनवेल महानगरपालिका , पाणीपुरवठा प्रशासन अधिकार्‍यांची नियमित पाणीपुरवठा करणेबाबत समन्वक बैठक बोलावून त्यामध्ये कृत्रिम पाणी टंचाई वददल सविस्तर चर्चा करून एक मास्टर प्लॅन करणेवावत सुचना दयावी अन्यथा भविष्यात शंतता सुव्यवस्थेचा प्रश्‍न पोलिस प्रशासनास हाताळावा लागणार आहे. तरी याबाबत सखोेल चौकशाी करण्याची मागणी भरत पाटील यांनी केली आहे.

Comments