स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी पनवेल महानगरपालिका निवडणूक लढविणार ; जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः आगामी काळात येवू घातलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी निवडणूक लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये दिली.
या संदर्भात त्यांच्या पक्षाची बैठक पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महेश साळुंखे यांनी सांगितले की, आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून आगामी महानगरपालिका निवडणूक लढविली जाईल. त्याचबरोबर समविचारी पक्षाशी युती करण्याचा विकल्प सुद्धा खुला ठेवलेला आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना 5 वर्षापूर्वी झालेली आहे. असे असले तरी अनेक मागासवर्गीयांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. या समाजाला न्याय देण्यासाठी व समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने तसेच महिलांच्या उन्नतीचा प्रश्‍न, बेरोजगाराचा प्रश्‍न आदी विषया संदर्भात पक्ष न्याय मिळविण्यासाठी ही निवडणूक लढविणार आहे. या संदर्भात लवकरच प्रभागनिहाय बैठका घेवून पदाधिकारी जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पनवेल परिसरात कार्यकर्त्यांचा मेळावा, महिला आघाडी मेळावा व इतर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.
फोटो ः महेश साळुंखे
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image