जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; रिक्षा चालकांना केली आर्थिक मदत
पनवेल दि.११ (वार्ताहर)- शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांनी खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार यांचा कोरोना काळात बंद पडलेला रोजगार आर्थिक सहाय्य करून सुरू करून दिला.
खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार हे आपला रिक्षा चालवून उदर निर्वाह करत होते. परंतु मागील  कोरोंना काळात त्यांचा  रोजगार बंद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन, आपली व्यथा मांडली. सध्याची परिस्थिती पाहता, विलंब न लावता जिल्हाप्रमुख शिरीष घरत  यांनी आर्थिक सहाय्य करून, त्यांचा बंद पडलेला रिक्षाचा व्यवसाय पुनः सुरू करून दिला व शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, शाखाप्रमुख सचिन ठाकुर, गिरिष गुप्ता आदि पदाधिकारी उपस्थित होते.
      
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image