खासदर श्रीरंग बारणे कळंबोली वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न

खासदर श्रीरंग बारणे कळंबोली वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न...

पनवेल दि.०७ (संजय कदम): शिवसेनेचे खा. श्रीरंग बारणे कळंबोली वसाहत परिसरासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी स्थानिक शिवसेनाा पदाधिकाऱ्यांनी याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.
        जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आणि विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर व डी. एन. मिश्रा कळंबोली शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने कळंबोली रोडपाली शहारातील १८ ते ४४ वयोगटांतील अनेक नागरिकांना शासनाकडून अजून पर्यंत लसीचा पहिला डोस मिळालेला नसून, नागरीकांमध्ये कोरोना संक्रमनाचा धोका वाढण्याची दाट भीती आहे, त्यामुळे कळंबोली - रोडपाली शहारातील नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करून देणे अत्यंत गरजेचे आहे. या कारणास्तव कळंबोली- रोडपाली शहारातील स्वतंत्र लसीकरण सत्राचे नियोजन शिवसेना कळंबोली- रोडपाली शहरशाखा तयार करीत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना शिवसेना कळंबोली- रोडपाली शहारा तर्फ लसीकरण केंद्र चालू करण्या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उपमहानगर समन्वयक प्रकाश चांदिवडे, शहर समन्वयक गिरीष धुमाळ, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, उपशहर प्रमुख नारायण फडतरे, विभाग प्रमुख महेश गुरव, विभाग प्रमुख आकाश शेलार, उपविभाग संघटक पंडित विकास मिश्रा, शाखा प्रमुख नागेश शेळके, उपशाखा प्रमुख अनिकेत कन्हेरे व शिवसैनिक उपस्थित होते. या मागणीला सकारात्मक दृष्टीकोन देत शासनाकडे याबाबत पाठपुरावा करून कळंबोली- रोडपाली शहारा मध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्या बाबत योग्य ती कारवाही केली जाईल असे आश्वासन खा. श्रीरंग बारणे यांनी दिले.
         फोटोः खा. श्रीरंग बारणे यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी
Comments