पनवेल : - पनवेल शहरातील मानाचा पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला टपाल नाका येथील 'टपालीचा राजा' ची यावर्षी गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती साकारली आहे .श्री गणेश मित्र मंडळ गेली ५९ वर्षे टपालीचा राजा गणेशोत्सव साजरा करत आहे. अध्यक्ष श्री सुनील खळदे असलेल्या या मंडळाने आतापर्यंत विविध सामाजिक, आरोग्य, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भारतीय संस्कृती आदी विषयांवर देखावे साजरे केले आहेत. अनेक संस्थांनी पारितोषिके, पुरस्कार या मंडळाला दिले आहेत.याही वर्षी कोरोनाचे नियम पाळून मंडळाने अत्यंत साधेपणाने श्रीगणेशाची मूर्ती साकारली आहे.
पनवेलचा मानाचा पहिला टपालीचा राजा, मंडळाची हिरक महोत्सवाकडे वाटचाल