फसवणूकीच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या अटकेत ; १४ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी

पनवेल / वार्ताहर :  -  नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील घडणा-या विविध गुन्ह्यांची ऊकल करण्याबाबत माननीय पोलीस उप आयुक्त सो. परि 2, यांच्या सुचना व मा. सहायक पोलीस आयुक्त, पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 231/2021, भादवि कलम 420 34 चे तपासा दरम्यान तळोजा पोलीस ठाणे  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी स.पो.नि. विजय पवार व गुन्हेप्रकटीकरण पथक यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्रा येथुन आरोपीत नामे सहाबुददीन मोईनुददीन खान रा. मुंब्रा यास ताब्यात घेवुन अटक केली. 
तपासा दरम्यान उघड गुन्हे,
1) ढोलका पोलीस ठाणे. राज्य- गुजरात. गु. रजि. नंबर 11192020210841/2021, भादवि कलम 468, 471, 406,420,114 प्रमाणे
2) मोहाडीनगर पोलीस ठाणे. ता. धुळे. गु. रजि. नंबर 115/2020, भादवि कलम 406,420,114 प्रमाणे
3) पंजाबी बाग पोलीस ठाणे. राज्य- दिल्ली. गु. रजि. नंबर 840/2021, भादवि कलम 406,420 प्रमाणे
यापुर्वी दाखल गुन्हे,
4) कळंबोली पोलीस ठाणे,नवी मुंबई. गु. रजि. नंबर 170/2017, भादवि कलम,420,34 प्रमाणे
5) खालापुर पोलीस ठाणे जि. रायगड. गु. रजि. नंबर 112/2017, भादवि कलम ,420,34 प्रमाणे गुन्हे करण्याची पद्धत,
यातील आरोपीत मार्केट रेट पेक्षा कमी भावाने लोखंडी रॉड, लोखंडी कॉईल, बॅटरी असा माल देतो असे सांगुन एखादया कंपनीत माल घेणारे पार्टीला घेवुन जावून  लोखंडी रॉड, लोखंडी कॉईल, बॅटरी दाखवतात. त्यानंतर सदर पार्टीला स्वताचे नावाचे कंपनीचे बॅक करन्ट अकाउंनट नंबर देवुन त्यात मालाचे पैसे टाकण्यास सांगतात त्यानंतर डिल निश्चित ठरल्यानंतर माल ट्रक मध्ये भरल्यानंतर पार्टी कडुन बँक खात्यात पैसे घेवुन पार्टीला माल न  देता लागलीच बॅक खात्यातुन पैसे काढुन बॅक  खाते व मोबाईल नंबर बंद करून पसार होतात.
तरी अशा मोडसे गुन्हे आपले पोलीस ठाण्यात अशा मोडसे गुन्हे दाखल असल्यास सदर आरोपीताचा ताबा घेवुन तपास करावा.
सदरची कामगिरी ही पो.नि.श्री.काशिनाथ चव्हाण, पो.नि. (गुन्हे) श्री दत्तात्रेय क्रिदे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. श्री. विजय पवार, पो.हवा./427 नैनश पाटील, पो.हवा./93 वैभव शिंदे, पो.ना. 2131 विजय पाटील, पो.ना./1833 शंकर शिंदे, पो.शि./12116 अनिल जाधव, पो.शि. 12152 स्वाप्निल पाटील, पो.शि./12070 संदेश उतेकर यांनी केली आहे

Comments