पनवेल वैभव / प्रतिनिधी :- वनौषधी प्रेमींचें आवडते वृत्तपत्र साप्ताहिक आर्या प्रहरने आपला आठवा वर्धापन दिन दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देवून आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.
यावेळी किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, शुभांगी वालेकर, आर्या प्रहरचे दत्तू कोल्हे, अँड. प्रगती ठाकूर, समाजसेवक उज्वल पाटील, निसर्ग प्रेमी सखाराम साठे, मनिषा साठे ,निसर्गोपचार तज्ञ ऋतुजा वालेकर, आर्ट अँड हॉबीज फाउंडेशनच्या चेअरमन सारिका बिरारी, आर्या वनौषधी संस्थेच्या रुद्रा बिरारी, डॉ.अशोक तांबेकर,तथास्तु ज्वेलर्सचे संजय बिरारी,बालाजी कुंचमवार, मंथन साठे,पत्रकार विक्रम येलवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील,पत्रकार दत्तू कोल्हे यांच्या हस्ते पांढरी मुसळी, जंगली आलं, श्वेत चित्रक, केवडा,रक्त चंदन, गुग्गुळ, कापूर,अर्जून,रुद्राक्ष, काड़ेचिराईत,आंबेमोहोर, लालचित्रक,आंबेहळद, काळी मुसळी,गुडमार,हरसिंगार, दमवेल,सीतेचे अशोक,जख्मेह्यात, गुळवेल, निरब्राम्ही,मल्टी व्हिटामिन आदी 250 दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देण्यात आली. निसर्गप्रेमी मनिषा साठे यांच्या हस्ते कळंबोली येथे वनौषधी रोपे लावण्यात आली.यावेळी सुधीर पाटील यांनी आर्या प्रहरच्या कार्याची व वनौषधी रोपांच्या औषधी गुणधर्मांची माहिती दिली.