पनवेल,दि.२७ : पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत आरोग्य विषयक किटचे वाटप आज (27 ऑगस्ट) खारघरमधील धामोळे येथील आदिवासी वाडीतील मूलनिवासी रहिवाशांना करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून मास्क, सॅनिटरी नॅपकिन, बिस्कीट पुडे, सॅनिटायझर असलेले 132 आरोग्य किटचे वाटप धामोळे येथील आदिवासी कुटूंबाना करण्यात आले.
यावेळी महापौर कविता किशोर चौतमोल महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर , नगरसेविका राजश्री वावेकर, विद्याताई गायकवाड, स्थानिक नगरसेविका मंजुळाताई कातकरी , सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, कविता मोकल प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी , महानगरपालिकेचे अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.