एसटी बसची ईको कारला धडक, पाच प्रवासी जखमी ....
एसटी बसची ईको कारला धडक, पाच प्रवासी जखमी ....

नवीन पनवेल : शेडुंग टोल नाक्याच्या पुढे रॉंग साईडने अचानक आलेल्या बसने ईको कारला धडक दिली. या धडकेत इको कार मधील पाच जण जखमी झाले आहेत. एसटी बस चालका विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     मोहोपाडा येथील बाळकृष्ण शांताराम गायकवाड यांची इको कार क्रमांक एम एच ४६ बिबी ४१८२ ने चांभार्ली येथून पाच प्रवासी घेऊन पनवेलला निघाले होते. त्यांची इको कार शेडुंग टोल नाक्यावरून पुढे पनवेलच्या दिशेने जात असताना टोल नाक्याच्या पुढे पहिल्या लेनवर रॉंग साईडने अचानक आलेल्या एसटी बस क्रमांक एम एच १४ बीजी ८४४१ ने वेगाने येऊन समोर इको कारला धडक दिली. या अपघातात गायकवाड यांच्या पोटाला दुखापत झाली तसेच प्रवाश्यांच्या पायाला, तोंडाला, छातीला, मनगटास जखम झाली आहे. या अपघातात इको कारचे नुकसान झाले असून एसटी बस चालक रामदास मावळे (वय ४२, शिरूर ) यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश मेहेर करत आहेत. 
Comments