युवा नेतृत्व यतिन देशमुख यांच्यावर शिवसेना उपमहानगरप्रमुख पदाची धुरा...
पनवेल दि. ०८ (वार्ताहर): युवा नेतृत्व यतिन देशमुख यांच्यावर नवीन पनवेल आणि पनवेल शहर शिवसेना उपमहानगरप्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

           नुकतीच शिवसेना नवीन पनवेल आणि पनवेल शहर उपमहानगरप्रमुखपदी यतिन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या संमतीने जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने यतिन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवड़ीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. नुकतेच त्यांना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महानगर समन्वयक पनवेल तालुका गुरूनाथ पाटील ,  उपमहानगर प्रमुख दिपक घरत, विभागप्रमुख राजेंद्र भगत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

           

Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image