पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गोल्डन ग्रुपचे आर्थिक योगदान....
पनवेल दि.१२ (वार्ताहर)- मैत्री हेच जीवन! हे ब्रीदवाक्य जोपासत मित्रांनी मित्रांची मित्रांसाठी चालवलेली संस्था म्हणजे गोल्डन ग्रुप पनवेल! सामाजिक उपक्रमांतून तळागाळातील जनमानसांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य गोल्डन ग्रुप सातत्याने करत आला आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून गोल्डन ग्रुप पनवेल या संस्थेने रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने जिल्हा आपत्ती नियोजन निधीमध्ये आर्थिक योगदान म्हणून रुपये २५००१/- चा धनादेश प्रशासनाला सुपूर्द केला आहे.
        महाड सह संपूर्ण रायगड जिल्ह्याला महापुराच्या दणक्यात प्रचंड आर्थिक व जीवित नुकसान सहन करावे लागले. तळीये गावावर दरड कोसळल्यामुळे संपूर्ण गाव नष्ट झाले, निष्पाप जीवांना हकनाक मुकावे लागले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना विविध टप्प्यावर मदत करण्याचे आपत्ती नियोजनाचे एक शास्त्र असते. त्यामध्ये एक दिवस, एक आठवडा, एक महिना यातील विविध टप्प्यांवर आवश्यक ती मदत करणे क्रमप्राप्त असते. पूर ओसरल्यावर पहिल्या दिवशी गरज असते ती स्वच्छ पिण्याचे पाणी, सुखे कपडे आणि शिजवलेले अन्न. एक आठवड्यानंतर गरज असते ती स्वच्छता, कोरडे राशन, साथीमुळे पसरणाऱ्या रोगांना अटकाव घालण्यासाठी लसीकरण आणि औषधोपचार. एक महिन्यानंतर आवश्यकता असते आर्थिक पाठबळ, घर शाकारणी आणि क्षतीग्रस्त गावांचे पुनर्वसन. यातील पहिल्या दोन फेजमध्ये प्रशासन, सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी अगदी झपाटून कार्य केलेले आहे. परंतु आता गरज आहे ती प्रशासनाचे हात बळकट करण्याची. नेमकी हीच गरज ओळखून गोल्डन ग्रुप पनवेल ने आपला खारीचा वाटा प्रशासनाच्या हवाली सुपूर्द केला आहे.
        परमेश्वर करो आणि आपत्ती येऊच नये. जर दुर्दैवाने आपत्ती ओढवली तर प्रत्येक वेळी आपले योगदान देण्यासाठी गोल्डन ग्रुप कायम सज्ज असेल असे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. गोल्डन ग्रुप ने समाजकार्यासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image