खाजगी बसमध्ये बेकायदेशीररित्या विनापरवाना बियरचे बॉक्स ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल


पनवेल दि.१६ (वार्ताहर)- विनापरवाना बेकायदेशीररित्या वेगवेगळ्या नामांकित कंपनीच्या भरलेल्या बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगून खाजगी कंपनीच्या बसमध्ये परिवहन करताना मिळून आल्या म्हणून पर्यटनासाठी आलेल्या ८ जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून खाजगी बससह बियरच्या बाटल्या असा मिळून ५,०४,८८९ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
        तालुक्यातील वाजेफाटा रोड समोरील रस्त्यावरून जात असलेल्या एका खाजगी बसमध्ये ८ जणांनी स्वतः जवळ विनापरवाना बेकायदेशीररित्या बियरच्या बाटल्या ताब्यात घेऊन जवळ बाळगल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर बस अडवून बसची तपासणी करून बसमधील ८ जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६६ (१) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
Comments