स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांच्यावतीने पूरग्रस्तांना मदत...

पनवेल / वार्ताहर :- रायगड कोकणपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र येथे सर्वत्र पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान आणि धुमाकूळ घातला आहे , अशातच विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष यांनी विविध रूपाने मदत केली , अशातच शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार  राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं , एक हात मदतीचा याच उक्तीप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू  यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण येथे शंकरवाडी या वाडीमध्ये गरजू आणि पुरग्रस्त लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तू तसेच अन्नधान्य ब्लांकेट्स तसेच जीवनावश्‍यक वस्तू औषधे या गोष्टींचा वाटप करण्यात आले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड  जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू हे नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रातले तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रम राबवत असतात , तसेच त्यांना  सामाजिक बांधिलकीची जाण  असून त्यांनी सर्वतोपरी पूरग्रस्तांना मदत करण्याचा  निश्चय केला .पूरग्रस्तांची संवाद साधले असता व चर्चा करत असताना पूरग्रस्तांची भयावह अवस्था त्यांच्या लक्षात आली असता  स्वाभिमानी शेतकरी  संघटनेकडून जास्तीत जास्त मदत त्यांच्यापर्यंत पोचवता येईल असे आश्वासन दिले .तसेच शासनाचे आणि स्थानिक पालिकेच्या गलथानपणा निदर्शनात आला , प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य व रोगराई याच्याशी लढण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत आहेत पण शासनाची कोणतीही मदत अद्यापही पूरग्रस्तांना पर्यंत पोहोचलेली नाही याविषयी खंत व्यक्त केली , कोयना धरणाचे पाणी अचानक सोडल्यामुळे याची कोणतीही पूर्वकल्पना कोणत्याही ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल आणि तसेच नुकसानही भरपूर प्रमाणात बघण्यास मिळाले , कोयना धरणावरून पाणी सोडताना कुठल्याही प्रकारची सतर्कतेचा इशारा देण्यात आला नव्हता त्यामुळे रात्रीच्या झोपेमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक लोकांचे हाल झाले , अनेक लोकांचे घरातील कागदपत्रे सिलेंडर महत्त्वाच्या वस्तू तसेच जीवनावश्यक सर्व वस्तू या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या , सर्व संस्थांच्या मदतीने अन्नधान्य तसेच गरजेच्या वस्तूंचा वाटप होत असलं तरी आज सर्व ग्रामस्थांच्या समोर एक समस्या आहे मिळालेले अन्नधान्य शिजवून खायचे कशावर यासाठी गावातील ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या , शासनाने तातडीची दहा हजाराची मदत जाहीर केली होती त्यापैकी एकही रुपया त्यांच्या  खात्यावर जमा झालेला नाही , सध्या परिस्थिती मध्ये पूरग्रस्त ग्रामस्थांना सिलेंडर तसेच शेगडी आणि आर्थिक मदतीची गरज आहे .हे सर्व पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर कडू यांनी कोयना धरण विरोधात संघटनेच्या बरोबर राहून झालेल्या नुकसानीच्या बाबतीत तसेच तसेच अचानक न सांगता सोडलेल्या पाण्याचे स्पष्टीकरण  शासनाकडे मागू आणि त्याचे उत्तर न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी  यांच्या नेतृत्वाखाली तीव्र  जन आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मधुकर कडू यांनी दिला .

यावेळेस शेतकरी स्वाभिमानी पनवेल तालुका उपाध्यक्ष गणेश म्हात्रे , सामाजिक कार्यकर्ते सर्वेश म्हात्रे उपस्थित होते.
Comments