साडे २२ लाखांच्या वाहनांसह मोठ्या प्रमाणात गुटखा केला तळोजा पोलिसांनी हस्तगत....

पनवेल दि.२७ (संजय कदम)- तळोजा पोलिसांकडुन लाखो रुपयांचा गुटखा , टाटा मोटर ट्रक व टाटा सुपर एस छोटा टेम्पो तसेच चोरीच्या गुन्ह्यातील मोटार सायकली व रिक्षा असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
             नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये नशा मुक्ती अभियान राबविण्याबाबत तसेच वाहन चोरीस आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याबाबत विपिन कुमार सिंह , पोलीस आयुक्त , नवी मुंबई , डॉ . जय जाधव , पोलीस सह आयुक्त , शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -२ पनवेल यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कार्यवाही चालू होती. तळोजा पोलीस ठाणे नेमणुकीतील पोउपनिरी कुटे यांना पेंथर, प्लॉट नं बी ४३ तळोजा एम.आय.डी.सी. या ठिकाणी गुटख्यांनी भरलेली दोन वाहने येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयीत दोन्ही वाहने त्यामध्ये टूक क. GJ 15 / AT / 8225 व टाटा सुपर एस.टॅम्पो – MH 43 / BP / 4517 अशी वाहने चालकाविना उभी असलयाची दिसुन आली. सदर दोन्ही वाहनांची तपासणी करता त्यामध्ये गुटखाजन्य पदार्थ असल्याचे दिसुन आल्याने त्याबाबत अन्न व औषध प्रशासन पेन जि. रायगड यांना माहिती देवून त्यांना पाचारण करून अन्न व सुरक्षा अधिकारी यांचे मार्फत टूक व टेम्पो मधील मालाची खात्री केली असता त्यामध्ये विमल गुटखा असल्याची खात्री झाल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली . सदर प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी यांनी नमुद टूक व टॅम्पो चालक व मालकांविरूध्द तकार दिल्याने तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचे व वाहनांचे मुद्देमाल असा मिळून १२ , ९ ६,०६४ / रु त्यामध्ये विमल पान मसाला व सुगंधीत तंबाख्नु ( गुटखा ), ७,00,000 / 5 किंमतीचा ट्रक नं G1 15 / AT / 8225 , २,५०,००० किंमतीचा टाटा सुपर एस.टॅग्यो में MH 43 / BP / 4517 एकुण -२२,४६,०६४ हस्तगत करण्यात आला आहे. 
           

फोटोः गुटखा हस्तगत केल्यासंदर्भात माहिती देताना पोलिस अधिकारी
Comments