मोटारगाडी फसवणूक व अपहाराप्रकरणी दोन आरोपी अटकेत ; २ कोटी १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत...
पनवेल दि. ०२ (संजय कदम)- मोटार गाडी यांची फसवणुक, अपहार करणाऱ्या ०२ आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या अटकेमुळे 7 गुन्ह्यांची उकल करून ३१ चार चाकी वाहने किमंत दोन कोटी दहा लाख रूपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.          
पोलीस आयुक्त, विपीन कुमार सिंग, सह पोलीस आयुक्त, डॉ . जय जाधव, पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे . परि - ०१ वाशी , सहा पोलीस आयुक्त भरत गाडे, तुर्भे विभाग , यांनी नागरीकांच्या फसवणुकीचे प्रमाणे वाढत असल्याने नमुद गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याच्या दिलेल्या सुचनांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार पो.नि. सुनिल गवळी (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरणाचे सपोनि राजेंद्र घेवडेक , सपोनि सचिन मोरे व स्टाफ यांनी नेरूळ पोलीस ठाणे गुन्हा नोंद कं . २७६/२०२१ कलम ४२०,४०६ हा गुन्हा उघडकिस आणला आहे. नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांची चार चाकी वाहने जास्तीचे भाड्याने मोठमोठ्या कंपनीत लावतो असे आमिष दाखवुन त्यांचेकडून त्यांची चार चाकी वाहने घेवुन पहिल्या एक दोन महिन्याचे भाडे देवुन त्यांच्या मार्फतीने आणखी इतर लोकांचे वाहने भाडे तत्वावर घेवुन नमुद सर्व वाहने तिहाईत व्यक्तीकडे गहाण ठेवून फसवणुक करून पळुन गेले होते. नमुद आरोपीतांचा गुप्त बातमीदार व तांत्रिक माहिती आधारे अनेक दिवस पाळत ठेवून अंधेरी मुंबई येथे सापळा रचुन छोलेलाल उर्फ राजेश शर्मा , वय -७४ वर्षे रा . खारघर ता पनवेल जि रायगड , मुळगांव- जौनपुर राज्य- उत्तर प्रदेश यास ताब्यात घेवून आरोपीताकडे तपास करून त्यांचा साथीदार नामे हरिषदास शिलोत्रे उर्फ पाटील, वय -४० वर्षे , रा . भिवंडी जि ठाणे , यास चेम्बुर मुंबई येथून ताब्यात घेवून अटक करून दोन्ही आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करून अटक आरोपीतांनी फिर्यादी यांचेकडुन भाडेतत्वावर घेतलेली वाहने तिऱ्हाईत व्यक्तीकडे गहाण ठेवले असल्याचे आढळून आले नमुद एकुण ०२ कोटी १० लाख रूपये किमंतीचे एकुण- ३१ चार चाकी वाहने महाराष्ट्रातुन व परराज्यातुन जप्त करण्यात आलेली आहेत.नमूद आरोपींकडून नेरुळ पो स्टे , न्हावाशेवा पो स्टे मानखुर्द पो.स्टे खारघर पो.स्टे वाशी पो.स्टे उपरोक्त गुन्हयातील नेरूळ पो.स्टे कडील एकुण- ०८ चार चाकी वाहने किमंत - ७६,00,000 / न्हावाशेवा पो.स्टे एकुण- ०१ चार चाकी वाहने किमंत २,७०,000 / मानखुर्द पो.स्टे एकुण- ०१ चार चाकी वाहने किमंत ६,७०,000 / खारघर पो.स्टे एकुण -०४ चार चाकी वाहने किंमत 29,00,000 / वाशी पो.स्टे एकुण- ०७ चार चाकी वाहने किंमत 30,00,000 / इतर साक्षीदार यांचे एकुण- १२ चार चाकी वाहने किंमत ९ ०,00,000 / भादवि ४२०,४०६ भादवि ४०६ भादवि ४०६ अशा प्रकारे आरोपीतांकडून उपरोक्त गुन्हयातील फसवणुक / अपहार केलेली १०० % मालमत्ता हस्तगत करून एकुण- ०७ फसवणुक, अपहाराचे गुन्हे उघडकीस आणुन दोन कोटी दहा लाख रूपयेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी वपोनि शाम शिंदे , पो.नि. गवळी ( गुन्हे ) , सपोनि राजेंद्र घोडेवरकर , सपोनि / सचिन मोरे, पो.हवा . / १०४० झांजे , पो.ना. / १७ बिरारी , पो.ना. / २३२० पाटील , पो.शि. / ३१४८ सानप , पो.शि. / १७२७ इंगळे , पो.शि / ३२२७ आव्हाड या तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.           


फोटोः हस्तगत केलेली वाहने व अधिकारी वर्ग
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image