कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पनवेलहून विशेष बससेवा....
कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पनवेलहून विशेष बससेवा....

पनवेल दि.24 (वार्ताहर) ः कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पनवेल एसटी आगारातून पनवेल ते कुडाळ अशी विशेष बस गणेश चतुर्थी निमित्त सोडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल रायगड तसेच श्री अविनाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश चतुर्थी निमित्त पनवेल ते कुडाळ यासाठी एसटी बस  दिनांक 8 सप्टेंबर 21 रोजी सायंकाळी 5.00 वाजता सोडण्यात येणार आहे.  एसटीचे प्रवास भाडे (फिक्स  680/_  रुपये) पर सीट आहे. तरी सिंधुदुर्गातील गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जि. र.हि. संघ कमिटी यांनी केले आहे. एसटीचे बुकिंग संध्याकाळी 6.00 ते 9.00 या वेळात संघाच्या कार्यालयात होईल. तसेच आपण संघाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधू शकता. यासाठी प्रदीप रावले- 7020401821/9976584482, दिपक तावडे- 9930681690, बाबाजी नेरूरकर- 9819711541 यांच्याशी संपर्क साधावा.
Comments