आर्या वनौषधीचा आगळावेगळा रक्षाबंधन, बहिणींनी रोपे भेट देवून पर्यावरण रक्षणाचे घेतले वचन
पनवेल वैभव  :-    भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा महिमा विशद करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देत असतो. यातही पर्यावरण संवर्धनाचे रक्षण झालं पाहिजे म्हणून याचं दिवसाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने रक्षाबंधन हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावांना रोपे भेट देवून पर्यावरण रक्षण करण्याचे वचन घेतले.
आर्या वनौषधीचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी या संदर्भात केलेल्या आवाहनास डहाणू, बोईसर, अलिबाग, पेण, पनवेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, उरण आदी भागातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.विशेष म्हणजे यात लहान मुलेही सहभागी झाली होती. सदर दिवशी १९०२ बहिणींनी आपल्या भावांना रोपे भेट देवून पर्यावरण संवर्धनाचे वचन घेतले.आर्या वनौषधींच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांचे पर्यावरण संवर्धनाचे वेगवेगळे प्रयोग सुरू असतात.पर्यावरण रक्षाबंधन हा त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे मत अक्षर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केले. तर डॉक्टर चारुशिला सरोदे  यांनी, सुधीर पाटील यांची वृक्षारोपण, संवर्धन या बद्दल असलेली तळमळ खूपच प्रेरणादायी आहे. त्याचे हे कार्य असेच बहरत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image