महाड येथील पूरग्रस्तांना श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे मदतीचा हात......

पनवेल / प्रतिनिधी : पनवेलमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्यावतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात आली. श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव व आनंद  चिंतामणी धुरी यांच्यामार्फत महाड येथील ५० पूरग्रस्त कुटुंबाना मदत पोहचविण्यात आली. यामध्ये तांदूळ, साखर, पीठ, गहू,  मीठ, गॅस, स्टील थाळी, स्टील ग्लास, टॉवेल, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, सॅनिटरी नॅपकिन, गाऊन, लादी कपडा, भांडी कपडा, मेडिसिन यासारख्या इतर अनेक आवश्यक वस्तू श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्यावतीने महाड येथील पुरग्रस्थांना पोहाचविण्यात आल्या आहेत.
Comments