विना परवाना अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकजण गजाआड....
विना परवाना अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकजण गजाआड....

पनवेल, दि. ४ (संजय कदम) ः विना परवाना अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले आहे.
एक इसम तळोजा नावडे ब्रीजखालील कच्च्या रोडवर अग्नीशस्त्र घेवून येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनि विजय पवार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळताच त्यांनी पो.नि.संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पवार, पो.हवा. नैनेश पाटील, पो.ना.विजय पाटील, पो.ना.शंकर शिंदे, पो.शि.अनिल जाधव, पो.शि.स्वप्नील पाटील, पो.शि.संदेश उतेकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी सर्वेश करुणाशंकर पांडे उर्फ साजन (28) याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 25 हजार रुपये किंमतीचा पिवळ्या सोनेरी रंगाचा भारतीय बनावटीचे लोखंडी पिस्टल आढळून आल्याने ताब्यात घेतले आहे. व त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), 1, 35 प्रमाणे कारवाई केली आहे.


फोटो ः अटक केलेला आरोपीसह तळोजा पोलिसांचे पथक
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image