सराईत रिक्षा चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ; १ लाख ७५ हजारांच्या तीन रिक्षा हस्तगत
पनवेल दि. २२ (संजय कदम)- पनवेल परिसरातून तीन रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत 1 लाख 75 हजारांच्या तीन चोरीच्या रिक्षा  हस्तगत करण्यात आल्या आहेत.
          पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय जोशी यांच्या सहकार्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलिस निरीक्षक अनिल देवळे, पो हवा नितीन वाघमारे, नितीन वाघमारे, पोना पंकज पवार, विनोद पाटील, भगवान साळुंके, गणेश चौधरी, पोशि राजू खेडकर आदींचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी सिसिटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार द्वारे माहिती घेत असताना  नुकताच तळोजा जेलमधून सुटलेला आरोपी सूरज लक्ष्मण झावरे (वय-20) याने सदर रिक्षा चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्याला या पथकाने सापळा रचून पनवेल परिसरातून ताब्यात घेतले असता त्याने पनवेलमधून तीन रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. 
सदर गुन्हेगार हा रिक्षात असलेल्या सॉकेटच्या वायरी काढून त्या वेगवेगळ्या भागात लावून रिक्षा चालू करून पळवून नेत असे याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील रिक्षा चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.         

फोटोः पोलिसांनी हस्तगत केलेली रिक्षा
Comments