पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने जपली सामाजिक बांधिलकी, पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात....

पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल तालुक्यातील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संघटना असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने आपली सामाजिक बांधिलकी जपत रायगड मधील पूरग्रस्तांना उभारणी देण्याच्या उद्देशाने आर्थिक योगदान दिले आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी पनवेलचे तहसीलदार यांच्याकडे मंचाच्या सदस्यांनी धनादेश सुपूर्द केला.
      अध्यक्ष माधव पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीमध्ये पूरग्रस्त बांधवांना उभारणी देण्याचे कामी आर्थिक योगदान देण्याचे ठरविले. तमाम सदस्यांनी आपापले योगदान देत खारीचा वाटा उचलला. सदर योगदान राज्य आपत्ती नियोजन निधी मध्ये देण्यात आले आहे.
        रायगड जिल्ह्यामध्ये महापुराने थैमान घातले होते ज्यामध्ये शेकडो संसार कोलमडून पडले, कित्येकांना हकनाक प्राण गमवावे लागले, तळीये सारखे तर संपूर्ण गाव उध्वस्त झाले आहे. प्राथमिक पातळी मध्ये आवश्यक ती मदत केल्यानंतर आता पूरग्रस्त बांधवांना आवश्यकता आहे भक्कम पुनर्वसन निधीची! याचे भान ठेवून पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने आर्थिक योगदान दिले आहे.
       सचिव मंदार दोंदे यांच्यासह मंचाच्या सदस्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला त्यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष हरेश साठे, विवेक पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, तृप्ती पालकर, राजू गाडे, प्रविण मोहोकर, अनिल कुरघोडे, अनिल भोळे, दिपक घोसाळकर,गौरव जहागीरदार,विकास म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.


चौकट
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. शासनाचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमच्या माध्यमातून पंचवीस ट्रक साहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पुराचे पाणी ओसरल्या दिवसापासून आम्ही अन्नछत्र सुरू केले होते. अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे.पुन्हा एकदा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या तमाम सदस्यांचे मनःपूर्वक आभार

विजय तळेकर 
तहसीलदार पनवेल.
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image