मंदिरातील देवाचे दागिने व पार्क केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद


नवी मुंबई / वार्ताहर :  -  नवी मुंबई , पालघर येथील मंदिरातील मुर्ती , देवाचे चांदिचे मुकूट , पादुका , दानपेटीत रोख रक्कम चोरी करणारे तसेच पार्क केलेल्या मोटार वाहनांच्या बॅटरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांचे टोळीस मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांचेकडून अटक सुमारे २ किलो ३५० ग्रॅम चांदी व २४ बॅटरी हस्तगत नवी मुंबई परिसरातील मंदिरामधील देवाचे दागिणे , वस्तू तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरीचे गुन्हे घडत असल्याने मा . पोलीस आयुक्त , श्री बिपीन कुमार सिंग व मा . अपर पोलीस आयुक्त , डॉ . श्री बी.जी. शेखर पाटील , नवी मुंबई यांनी मंदिरातील देव देवतांचे दागिणे , दानपेटीतील रक्कम यांची चोरी होत असल्याने ही अतिशय गंभीर , संवेदनशिल व नागरिकांचे भावनेशी निगडीत बाब असल्याने असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने गुन्हे शाखेचे मा . पोलीस उप आयुक्त , प्रविणकुमार पाटील  विशेष मोहीम राबवून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश केलेले आहेत , मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एन.बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली समांतर तपास चालु असताना , मध्यवर्ती कक्षाचे सपोनि राजेश गज्जल व पोशि राहुल वाघ यांना मंदिरांमध्ये चोरी करणारे सराईत आरोपी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी / अंमलदार यांनी नेरुळ परिसरात सापळा लावून १ ) सुभाष शितलाप्रसाद केवट , वय ३५ वर्षे , रा . राजीव गांधी ब्रिज खाली असलेल्या झोपडयात , शिरवणे गाव , सेक्टर १ , नेरुळ , नवी मुंबई तसेच राह . मु.पो.कुदेवाडी , ता . निफाड , जि . नाशिक मुळ राह . गाव - पिपरीस , पो . महादेवा , ता . ज्ञानपूर , ठाना - बदोही , जि . बनारस , उत्तरप्रदेश २ ) मगबुल जोमू शेखर उर्फ चिरा , वय ३८ वर्षे , रा . भाउची चाळ , हनुमान मंदिराचे समोर , मेडीकल दुकानाचे बाजूस , दिवाळे गाव , सेक्टर , नेरूळ , नवी मुंबई मुळ राह . गाव - आलादी तुल्ला , पो.पंचनंदपूर , ठाना - कलीयाचौक , जि . मालदा , पश्चिम बंगाल ३ ) राजू मारूती वंजारे , वय ३० वर्षे , राह . राजीव गांधी ब्रिज खाली असलेल्या झोपडयात , रिक्षा गॅरेजच्या बाजूस , शिरवणे गाव , सेक्टर १ , नेरूळ , नवी मुंबई मुळ राह . मु.खिंडा , पो.ता. मालेगाव , जि . वाशिम यांना शिताफीने ताब्यात घेतले . सदरचे इसम अतिशय सराईत असल्याने त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी पाससिक हिल , सीबीडी बेलापूर येथील राधा गिरीधारी मंदिरातील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली . या घटनेबाबत सीबीडी पोलीस ठाणे , गु.रजि.नं. १०८/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८० , ४५४ , ४५७ , ३४ गुन्हा दाखल असून नमुद गुन्हयामध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली . 
पुढील तपासामध्ये वरील आरोपींनी चोरी केलेले देवाचे चांदीचे मुकूट वितळुन देणारा इसम नामे ४ ) आसित कालीपदो दास , वय ४५ वर्षे , राह . सी १ , शांतीनिकेतन अपार्टमेंट , बिल्डींग नं . ६ , दत्त मंदिरा जवळ , सेक्टर ०३ , नेरूळ , नवी मुंबई मुळ राह . जंगलपाडा बाझार , ठाना- चंदीदला , जि . हुकली , कलकत्ता , पश्चिम बंगाल यास देखील गुन्हयात अटक केली . अधिक तपासामध्ये आरोपींत इसमांनी १ ) सीबीडी पोलिस ठाणे , गु.रजि.नं. १०८/२०२१ भा.द.वि.सं.कलम ३८० , ४५४,४५७ , ३४ ( राधा गिरीधारी मंदिर , पाससिक हिल , सीबीडी येथील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटीतील रोख रक्कम ) २ ) न्हावाशेवा पोलीस ठाणे , गु.रजि.नं .८४ / २०२१ भा.द.वि.सं. कलम ३८० , ३४ ( विठ्ठल रुखमाई मंदिर , खारकोपर येथील मुर्तीचे सोन्याचे दागिणे व चांदिच्या पादुका )
३ ) नेरुळ पोलीस ठाणे , गु.रजि.नं. २८०/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३७ ९ , ३४ ( बालाजी मंदिर , नेरूळ येथील दानपेटी फोडून रोख रक्कम ) ४ ) वालीव पोलीस ठाणे , जि . पालघर गु.रजि.नं. ११६ ९ / २०२० भा.द.वि.सं. कलम ३८०,४५७ , ३४ ( चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर , मुंबई - अहमदाबाद हायवे , सातीवली , पालघर येथील मुर्ती ) नवी मुंबई , पालघर येथिल वेगवेगळया मंदिरांमध्ये चोरी केलेले गुन्हे उघडकीस आले असून नमुद गुन्हयातील चोरी केलेले देवदेवतांचे चांदिचे मुकूट , पादुका इत्यादी असे सुमारे २ किलो ३५० ग्रॅम वजनाची चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे . तसेच अधिक तपासामध्ये नमुद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परीसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या २४ बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या असून एकुण त्याचेकडून सुमारे ३,२५,००० / -रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . सदरचे आरोपी हे घरफोडी चोरी करण्यात सराईत असून आरोपी नामे सुभाष शितलाप्रसाद केवट , याचेविरूध्द यापुर्वी मंदिरातील व इतर चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) एनआरआय सागरी पोलीस ठाणे , गु.रजि.नं. २४/२०२० भा.द.वि.सं. कलम ३७ ९ , ३४ , २ ) पंचवटी पोलीस ठाणे , नाशिक गु.रजि.नं. ४४ ९ / २०१६ भा.द.वि.सं. कलम ३८०,४५४,४५७ , ३ ) कडेवाडी पोलीस ठाणे , निफाड , नाशिक गु.रजि.नं. ११८/२०११ भा.द.वि.सं. कलम ३८० , ३४ ४ ) गुलाबवाडी पोलीस ठाणे , नाशिक गु.रजि.नं. ५७/२००७ भा.द.वि.सं. कलम ३७ ९ , ३४ ५ ) अडगाव पोलीस ठाणे , गु.रजि.नं. २१७/२०१५ भा.द.वि.सं. कलम ३८० , ३४ ६ ) उपानगर पोलीस ठाणे , गु.रजि.नं. १११/२०१६ भा.द.वि.सं. कलम ३८० , ३४ ७ ) मुंबई नाका पोलीस ठाणे , गु.रजि.नं. ६०/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३८० , ४५४,४५७, 
सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर , सहा . पोलीस निरीक्षक राजेश गज्जल , ज्ञानेश्वर भेदोडकर , जी.डी. देवडे , व पोलीस अमलदार सतीश सरफरे , आतिष कदम , हरेश भगत, लक्ष्मण कोपरकर , अजय कदम , राहुल वाघ , व विजय खरटमोल, नितीन जगताप यांनी केलेली आहे
Comments