पनवेल / प्रतिनिधी :- पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही पनवेल तालुक्यातील क्रियाशील पत्रकारांची नोंदणीकृत संघटना आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहणाऱ्या या संस्थेची नुकतीच विशेष कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंचाच्या सर्व सदस्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली.
पनवेल तालुक्यातील पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. नुकतीच मंचाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन निधीमध्ये आर्थिक मदत करण्यात आली होती. सध्याच्या घडीला मंचाचे सदस्य होण्यासाठी पत्रकारांची रीघ लागली आहे. त्यामुळे चालू वर्षात कुठल्या सदस्यांना अंतर्भूत करून घ्यायचे, या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंचाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्ष माधव पाटील, सल्लागार डॉ.संजय सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, सामना चे प्रतिनिधी संजय कदम, सिटी बेल चे समूह संपादक विवेक पाटील, रसायनी टाइम्स चे संपादक अनिल भोळे, रामप्रहरचे प्रतिनिधी हरीश साठे, पनवेल वैभव चे संपादक अनिल कुरघोडे, मल्हार टीव्ही चे प्रवीण मोहोकर, टी वी 9 च्या तृप्ती पालकर, आपले महानगर चे प्रतिनिधी भरतकुमार कांबळे, अभेद्य प्रहार चे उपसंपादक शंकर वायदंडे, कोकण लेखणी चे संपादक असीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.