पनवेल(प्रतिनिधी) टाटा कॅपिटल या टाटा समूहातील प्रमुख वित्तीय सेवा कंपनीने ग्रामीण महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये व्यावसायिक विकास प्रकल्पांची मालिका हाती घेतली आहे. या तीन राज्यांमधील समुदायांमध्ये पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी प्रदान करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत ‘टाटा कॅपिटल’ने 'ग्रीन स्विच' आणि 'जलआधार' हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत.
या अनुषंगाने ग्रीन स्विच प्रकल्पामध्ये हवामान बदलातील शाश्वतता, आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. स्थानिक लोकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचे स्त्रोत पुरवण्याच्या उद्देशाने जलआधार प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पातून तांत्रिक एकत्रीकरण आणि समुदायाची सहभाग यांस प्रोत्साहन देण्यात येते. हे दोन्ही प्रकल्प सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमध्ये कार्यरत आहेत आणि येत्या काही वर्षांत त्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे.
‘टाटा कॅपिटल’च्या सीएसआर उपक्रमांविषयी बोलताना‘टाटा कॅपिटल’चे सीएसआर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीधर सारथी म्हणाले, “स्थानिक समुदायांवर आणि त्यांच्या परिसंस्थेवर प्रभाव पडेल, अशा प्रकारे वंचितांचे परिवर्तन करण्यास टाटा कॅपिटल वचनबद्ध आहे. भविष्यातील आरोग्यदायी आणि शाश्वत वातावरण निर्माण करण्यासाठी लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यास सक्षम बनविण्यातस्वयंसेवी संस्थांसोबत, कार्यक्षम तंत्रज्ञानासह काम करण्याच्या आमच्या सहयोगी दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आम्ही आपले सीएसआर प्रकल्प भारतभर विस्तारित करीत आहोत आणि त्यातून आम्ही लोकांच्या जीवनात व राहणीमानात अर्थपूर्ण बदल घडवून आणत आहोत.