पनवेल मधील मुलींना मिळाले राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये यश...

पनवेल दि.02 (वार्ताहर)- पनवेल मधील 2 मुलींनी 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित 4 थ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. कु योगिनी पाटील 52 किलो वजन गटात खेळली आणि महाराष्ट्रासाठी रौप्य पदक जिंकले. तिने तिच्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. अंतिम सामन्यात ती हरियाणा कडून गुणांवर हरली.
      कु.मधुरा पाटील 54 किलोमध्ये खेळली आणि क्वार्टर फायनलमध्ये हरियाणाकडून गुणांवर हरली. तिच्या प्राथमिक फेरीत तिने पहिल्या फेरीत ओरिसा बॉक्सरचा पराभव केला होता. दोन्ही बॉक्सर्स खेलो इंडियासाठी पात्र झाले आहेत. जे फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दोन्ही मुलींना एमपीएसए बॉक्सिंग क्लबमध्ये अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांचे विशेष प्रशिक्षण मिळत आहे.
          

फोटोः राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले यश
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image