महापालिका क्षेत्रातील शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन....

पनवेल,दि.१६ : लवकरच शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती उद्या (१७ ऑगस्ट) पनवेल महापालिका क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षक, स्पर्धेकरीता व शिक्षणाकरीता परदेशी जाणाऱ्यां विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

पालिका क्षेत्रातील शिक्षकांव्यतिरिक्त  इतर नागरिकांचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सोडून इतर लसीकरण केंद्रावरती लसीकरण करण्यात येईल. तसेच महाविद्यालयीन प्राध्यपकांचे लसीकरण होणार नाही याची नोंद घ्यावी. शिक्षकांनी लसीकरणासाठी येताना सद्यघडीला कार्यरत असलेल्या शाळेचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. अशी माहिती वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.
Comments