जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेला लसपुरवठा ; जिल्ह्यातील ३५ % वाटा महापालिकेला.....


पनवेल दि.४ (वार्ताहर): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले लसवाटप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत आता घेतले आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात मागील आठवडाभरात लसपुरवठा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याने लसींचा पुरवठा वाढला आहे.जिल्ह्याच्या ३५ टक्के वाटा पनवेलला देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे.
     
पनवेल महापालिका क्षेत्रात लसीकरणच्या चौथ्या टप्पा सुरू झाल्यानंतर लस सुरळीत येत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पनवेलमध्ये महापालिकेच्या १८ लसीकरण केंद्रातून दररोज सुमारे ३५०० पेक्षा अधिक लसीकरण करण्यात आलेले आहे. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण होवू शकले नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नियोजनातून सुरू असलेले लसीकरण वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नियोजन स्वताकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवडाभरापासून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पदमश्री भैनाडे यांच्याकडे लसवाटपाची सुत्रे देण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात लसीकरणाची मागणी लक्षात घेता उपलब्ध लसींपैकी ३५ टक्के लस महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुर्वी कधी ५०० तर कधी जास्तीत जास्त १५०० लस दिल्या जात होत्या. आता २ हजार ते ३ हजार लस एका दिवशी देण्यात आल्यामुळे पनवेल महापालिकेला पुरेसा लससाठा उपलब्ध झाला आहे.
      कोविशिल्ड आणि कोव्हँक्सीन प्रकारच्या दोन्ही लस मिळून पनवेल महापालिका क्षेत्रात २ लाख १० हज़ारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. दुसऱ्या डोससाठी ९२ हजार ३०७ कोव्हीशिल्ड आणि ११ हजार ४१२ कोव्हँक्सीनचे लाभार्थी शिल्लक आहेत.
Comments
Popular posts
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image