आदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न......

पनवेल / वार्ताहर :- दि.१३ पनवेल तालुक्यातील सारसई विभागातील टपोरा वाडी आणि गोविंद वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी युसूफ मेहेरली सेंटरच्या वतीने नुकताच दोन दिवसीय कृषी विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी सेंटरचे उपाध्यक्ष हरेश शहा, भारत कृषी समाजचे कृषी तज्ञ जेकब नल्लिनाथन, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बाळकृष्ण सावंत अंजना पवार, स्मिता कांबळे, कृषि सहाय्यक प्रसाद पाटील ग्रामपंचायत सदस्या मनिषा वाघे, अंजना पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणात मल्लिनाथन यांनी उपस्थिना खरीप हंगामात आधुनिक पद्धतीने भात, नाचनी, वरी लागवड पद्धती विषयी मार्गदर्शन केले तर कृषी अधिकारी चौधरी यांनी आदिवासी बांधवांसाठी बांधावर तूर लागवड म.ग्रा.रो.ह.योजना, फळबाग लागवड, पिक विमा योजना, बांबू लागवड, शेवगा लागवड व परसबाग लागवडीसह शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तेजस चव्हाण, महेश गंगावार,राम वाघे, रेहमान शेख यांनी मेहनत घेतली
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image