सीवूड्स वाहतूक पोलिसांची धडक मोहीम ; एका दिवसात ८९ वाहनांवर कारवाई ....
नवी मुंबई / वार्ताहर :- नवी मुंबई पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई परिसरातील सीवूड्स वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये टी एस चाणक्य सिग्नल येथे रविवारी ता. 25 रोजी 05-30 ते 11-00 वाजेपर्यंत विशेष कारवाई मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान एकूण वाहनचालकांवर 89 कारवाई करण्यात आली. त्यापैकी इंटर सेक्टर गाडी नंबर एक 31 व दोन नंबर गाडी 18 आशा यांनी स्पीड च्या केसेस केलेले आहेत. त्याचबरोबर अमलदारामार्फत विना हेल्मेट वाहन चालवीणाऱ्या 15, विना सीट बेल्ट 06 , कर्कश आवाजाच्या 02 गाड्यांवर व इतर 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या विशेष कारवाईदरम्यान वाहन चालकांकडून पेंटिंग वसुली कार्ड पेमेंट रुपये 20700 व कॅश पेमेंट 10800 अशी करण्यात आली आहे

कोट : वरिष्ठ्यांच्या मार्गदर्शनाखली सीवूड्स हद्दीमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम आणखी कडक  करणार आहोत. त्याचबरोबर वेगाने मोटरसायकल चालवीणाऱ्याची धरपकड करणार आहोत.  - पवन भिंगारदिवे, 
सहाय्यक पोलीस निरीक्षक,
सीवूड्स वाहतूक शाखा.
Comments